Team MyPuneCity – कौटुंबिक वादातून सासूचा गळा आवळून (Talegaon Dabhade) खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात घालून टेरेसवर ठेवला. सडलेला मृतदेह पतीच्या मदतीने नाल्यात फेकून दिल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे सन २०२१ मध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी सून आणि मुलाला अटक केली होती. वडगाव मावळ सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे एल गांधी यांनी आरोपी सुनेला सासूच्या हत्येप्रकरणी सश्रम जन्मठेपेची तर मयत महिलेच्या मुलाला १८ महिने कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
Lonavala Crime News : लोणावळा पोलीस ठाण्यासमोरील दुकानात चोरी
पूजा मिलिंद शिंदे असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सुनेचे नाव आहे. आरोपी पूजा शिंदे हिने वारंवार होणाऱ्या सासू सोबतच्या वादाचा राग मनात धरून एके दिवशी वादा दरम्यान सासूचा ब्लाउजने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह दोन दिवस टेरेसवर पोत्यामध्ये बांधून ठेवला. संध्याकाळी दिराने आई कुठे आहे असे विचारले असता ती माझ्यासोबत वाद करून घरातून निघून गेली असे सांगितले. राहत असलेल्या परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने व तक्रार आल्याने शेजाऱ्यांनी तुमच्या टेरेसवर असलेल्या पोत्यातून घाण वास येत असून ते फेकून द्या, असे सांगितले. आरोपी पूजा हिने ते पोते ओढत ओढत नेऊन नाल्यामध्ये नेऊन टाकले. या प्रकरणामध्ये तिचा नवरा मिलिंद शिंदे(Talegaon Dabhade) याच्याकडून तिला अनभिज्ञ मदत झाली.
सरकारतर्फे खटल्यामध्ये विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांची नियुक्ती होती. सरकारी अभियोक्ता स्मिता चौगुले यांनी न्यायालयात खटल्यामध्ये मुख्यत्वे करून वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे याच्यासह साक्षीदारांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर करून युक्तिवाद केला. त्याकरिता त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले व सरकारतर्फे भक्कमपणे बाजू मांडली. न्यायालयाने अभियोग पक्षाचे साक्षी पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सुनेस सश्रम जन्मठेप कारावासाची शिक्षा व दहा हजार दंड तसेच तिचा पती मिलिंद शिंदे यास 18 महिने तुरुंगवास व दहा हजार दंड अशी शिक्षा ठोठावली.
देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार, तत्कालीन तपासी अधिकारी नारायण पाटील, कोर्ट पोलीस अंमलदार अविनाश गोरे यांनी न्यायालयात पाठपुरावा (Talegaon Dabhade) केला.