Team MyPuneCity -घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये धोकादायक व बेकायदेशीररित्या गॅस भरताना एकाला रंगेहाथ पकडून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी केली.
सत्यवान वेंकटराव बिरादार (वय ३५, रा. स्वप्ननगरी सोसायटी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे; मूळ रा. सोमपूर, ता. माळकी, जि. बीदर, कर्नाटक राज्य) असे आरोपीचे नाव आहे.
ही घटना २९ मे २०२५ रोजी रात्री ९.२० वाजताच्या सुमारास वराळे फाटा ते शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या रोडलगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये घडली. आरोपीकडे भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून लोखंडी नोजलच्या सहाय्याने अन्य सिलेंडरमध्ये गॅस भरताना आढळून आला. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी होती.
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड ते राजगुरुनगरदरम्यान दररोजचा प्रवास ठरत आहे मानसिक छळ
या प्रकाराची फिर्याद सागर वामनराव सूर्यवंशी (वय ३९ वर्षे), पोलीस हवालदार, गुन्हे शाखा युनिट ५, पिंपरी-चिंचवड यांनी दिली आहे.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोवारकर हे करीत आहेत.