Team My Pune City – राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे 28 जुलै ते 8ऑगस्ट या कालावधीत ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार (TAIT-2025) आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची शिक्षक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता तपासली जाणार आहे. परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांनी वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यानुसार परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक (TAIT-2025) आहे.
प्रवेशपत्र (Hall Ticket) उमेदवारांना 21 जुलै पासून परिषदेकडील अधिकृत संकेतस्थळावर (www.mscepune.in/dtetoda/TAIT2025InfoAppear.aspx) उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रवेशपत्रावर परीक्षेचा दिनांक, वेळ व परीक्षा केंद्राचा पत्ता यांचा तपशील असणार आहे.
या परीक्षेनंतर उमेदवारांना त्यांच्या गुणांनुसार गुणपत्रक (Score Card) दिले जाणार असून, हे गुणपत्रक शिक्षक भरती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावेल. यंदा परीक्षेस पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना सामान्य, मागासवर्गीय व महिला प्रवर्गानुसार ठरवण्यात आलेल्या किमान गुणांची अट पूर्ण करावी लागणार आहे.
परीक्षा परिषदेकडून केलेले आवाहन:
TAIT-2025 परीक्षेतील सहभागी उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर भेट देत परीक्षेशी संबंधित महत्त्वपूर्ण सूचनांची माहिती घ्यावी. प्रवेशपत्र न मिळाल्यास अथवा इतर अडचणी आल्यास परिषदेकडे तात्काळ संपर्क साधावा. कोणतीही मुदतीनंतरची विनंती मान्य केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देखील परिषदेकडून देण्यात आला (TAIT-2025) आहे.