Monday
Pimpri : सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल परमिट रूम आणि बार बंद
तिप्पट कर वाढीचा निषेध करीत हॉटेल बंद ठेवण्याचा संघटनेचा इशारा Team My pune city – राज्य सरकारने मद्य विक्रेत्यांवर अन्यायकारकपणे करवाढ लादली ( Pimpri) आहे. यामध्ये मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून दहा टक्के, वार्षिक परवाना शुल्क मध्ये १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. या वर्षभरात ही तिसऱ्यांदा करवाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडतील आणि इच्छा नसताना देखील त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल पर्यायाने बेरोजगारीत वाढ होईल. राज्य सरकारने केलेल्या या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १४ जुलै) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्स परमिट रूम व बियर बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. Akurdi Crime News : भीक न दिल्याने तरुणाला चाकूने भोसकले शनिवारी, पिंपरी गणेश हॉटेल येथे झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, नवीन लायगुडे, पद्द्मनाभ शेट्टी, राकेश शेट्टी, बापूसाहेब फटांगरे, सुमित बाबर, सत्यविजय तेलंग, हरीश शेट्टी, सुधाकर शेट्टी, संतोष ठाकूर, तेजस जुनवणे, नंदकुमार काटे, अभिषेक शेट्टी, जगदीश शेट्टी, रमेश तापकीर, चेतन फुगे, किरण सुवर्णा, महेश नागराणी आदी पदाधिकारी तसेच हॉटेल व्यवसायिक उपस्थित ( Pimpri) होते. ...