Adkar Foundation
Adkar Foundation : ॲड. आव्हाडांप्रमाणे ज्ञानाधारित प्रकाशवाटेची गरज- भारत सासणे
आडकर फौंडेशनतर्फे डॉ. संजय चोरडिया यांचा ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने गौरव Team My Pune City – सर्वांगिण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने नैतिकता जपणे आवश्यक (Adkar ...
Adkar Foundation : पंढरीच्या वारीमुळे मराठी भाषा टिकून – डॉ. सदानंद मोरे
आडकर फौंडेशनतर्फे ‘विठ्ठलवारी आनंद वारी’ पुस्तकाचे प्रकाशन Team My pune city –पंढरीची वारी ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. संतांच्या (Adkar Foundation)मराठी भाषेचा प्रचार होण्यासह ती टिकविण्याचे कार्य वारीच्या माध्यमातून होत आहे. या वारीची अलौकिक परंपरा, सत्यता, महती वाचकांपर्यंत पोहोचविण्यास ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ या ग्रंथाचा दस्तावेजासारखा उपयोग होणार आहे, असे गौरवोद्गार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले. Alandi : शनी अमावस्येनिमित्त शनी मंदिरात भाविकांची गर्दी आडकर फौंडेशनतर्फे बबनराव पाटील लिखित ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ या पुस्तकाचा (Adkar Foundation) प्रकाशन सोहळा आज (दि. २३ ऑगस्ट) नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झाला. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिखर बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. डॉ. मोरे पुढे म्हणाले, वाचकांच्या आजच्या काळातील अपेक्षेनुसार बदलत्या तंत्रज्ञानाला अनुसरून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकात अनेक अभ्यासक, विचारवंताचे लेख, उत्तम छायाचित्रे, दृकश्राव्यमाध्यमाचा चपखल वापर केल्याने वारीचे समग्र दर्शन घडणार आहे. हे पुस्तक वारीविषयी सर्वांगिण माहिती देणारे असल्याने वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. तंत्रज्ञानाची कास धरत संपूर्ण वारीचे समग्र दर्शन घडविणारी ही पहिलीची निर्मिती असल्याने हे पुस्तक निर्मितीक्षेत्रातही वस्तुपाठ ठरणार आहे. श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती : विद्याधर अनास्कर विद्याधर अनास्कर म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून पंढरीच्या वारीचा प्रसादरूपी ठेवा वाचकांपर्यंत आला आहे. विठ्ठल हा वारकऱ्यांचा देव, कष्टकऱ्यांचा आधार आहे. त्याच्या वारीतून निर्माण होणाऱ्या श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती या पुस्तकातून उलगडली आहे. हे नुसते पुस्तक नसून लेखकाच्या साधनेचा कृतीतून साकारलेला सत्य आणि सौंदर्यांचा मिलाफ आहे. (Adkar Foundation) विद्याधर अनास्कर म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून पंढरीच्या वारीचा प्रसादरूपी ठेवा वाचकांपर्यंत आला आहे. विठ्ठल हा वारकऱ्यांचा देव, कष्टकऱ्यांचा आधार आहे. त्याच्या वारीतून निर्माण होणाऱ्या श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती या पुस्तकातून उलगडली आहे. हे नुसते पुस्तक नसून लेखकाच्या साधनेचा कृतीतून साकारलेला सत्य आणि सौंदर्यांचा मिलाफ आहे. ...
Pune : केवळ दृष्टीमुळे नव्हे तर जीवनदृष्टीमुळे जगणे प्रकाशमान -मिलिंद जोशी
आडकर फौंडेशनतर्फे रवी वाघ यांचा डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्काराने गौरव Team MyPuneCity – धडधाकट व्यक्ती दु:खे सजवतात म्हणून ती दु:खे मोठी होतात. आशा-निराशेच्या खेळात निराशा ...
Pune : रवी वाघ यांना डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार जाहीर
आडकर फौंडेशनतर्फे शुक्रवारी होणार गौरवTeam MyPuneCity –आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ दृष्टीहीन, मूकबधीर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या डॉ. हेलन केलर स्मृती ...
Pune: राजेंद्र पवार कर्तव्यनिष्ठ बहुआयामी व्यक्तीमत्व – डॉ. श्रीपाल सबनीस
अतुलनीय योगदानाबद्दल आडकर फौंडेशनतर्फे राजेंद्र पवार यांचा गौरव Team MyPuneCity –आई-वडिलांचे आशीर्वाद आणि संस्कार लाभलेल्या राजेंद्र पवार यांचा प्रवास शून्यातून सुरू झाला. मातीशी आणि ...
Rajendra Pawar: आडकर फौंडेशनतर्फे रविवारी राजेंद्र पवार यांचा सत्कार
Team MyPuneCity –पुणे येथे महावितरणचे मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असताना राजेंद्र पवार यांनी अतुलनीय योगदान देत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांची पदोन्नतीवर महावितरणच्या ...