पंडित सी. आर. व्यास
Pune:पंडित सी. आर. व्यास भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘चिंतामणी रत्न’
पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित शशी व्यास, श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन पुस्तकाचे प्रकाशन Team MyPuneCity – पंडित सी. आर. व्यास यांचे सुरांशी अनोखे नाते होते. (Pune)गाण्यातील सातत्य, रियाज संगीताला प्रवाहित ठेवते या विचारांनी पंडित व्यास यांनी आपल्या सर्व शिष्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या गायन साधनेला आध्यात्मिक बैठक होती. क्षमाशिलता ही त्यांची मोठी ताकद होती. ते संन्यस्त गृहस्थ होते. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताप्रती विलक्षण ओढ होती. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रांतात ते चिंतामणी रत्नच होते, अशा शब्दांत पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक जीवनपट उलगडला. निमित्त होते ग्रेस फाऊंडेशनचे प्रमुख शशी व्यास आणि श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. हिराबाग येथील श्रीराम लागू रंगअवकाश (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे पॉप्युलर प्रकाशनतर्फे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शशी व्यास, श्रुती पंडित, पंडित सुहास व्यास, मोनिका गजेंद्रगडकर, अपर्णा केळकर यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यांनी संवाद साधला. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांनी या पुस्तकाचे संपादन केले (Pune) आहे. Pankaja Munde: विकासक आणि वास्तुविशारदांनी ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकाराव्यात – पंकजा मुंडे पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र व शिष्य पंडित सुहास व्यास म्हणाले, वडिलांनी आपल्याला कायमच इतर शिष्यांप्रमाणेच गुरूच्या भूमीकेतून संगीताचे ज्ञान दिले. संगीताच्या रियाजाविषयी ते कायम आग्रही होते. ‘सा’ची साधना धनाच्या अपेक्षेशिवाय करा ही बाबांची शिकवण होती. शशी व्यास म्हणाले, पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा, बंदिशकार म्हणून असलेली त्यांची महती, त्यांच्या सृजनशीलतेचा काळ, गुरूंसाठी केलेला संघर्ष वाचकांसमोर यावा या हेतूने त्यांचा सांगीतिक जीवनप्रवास ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. ...