गानवर्धन
Pune : गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांचा कै. सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्काराने गौरव
Team MyPuneCity – तो न गातो ऐकतो तो सूर आपला’ या ज्येष्ठ कवी चिं. त्र्यं. खानोलकरांच्या उक्तीप्रमाणे कलाकाराचा प्रवास आपल्या आतल्या स्वराचा आर्त आवाज ऐकत जनतेसाठी गाणारी गाणी जनार्दनापर्यंत पोहोचणारा असावा. अनुभव आणि अनुभूती यांचा मेळ घालत (Pune) कलाकाराने साधना करावी, असे आवाहन सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश रानडे यांनी केले. अभिजात संगीताला प्रेरणा देणाऱ्या गानवर्धन संस्थेमार्फत कै. सुचेता नातू स्मृती युवा पुरस्काराने सतारवादक नेहा विदुर महाजन यांना आज (दि. २९) सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण सुरेश रानडे आणि जयश्री रानडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सुरेश रानडे बोलत होते. दहा हजार रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गानधर्वन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, डॉ. सदानंद मोरे, पीएनजीचे पराग गाडगीळ, ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, राजश्री महाजनी मंचावर (Pune) होते. Priyanka More : देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रियंका मोरे यांची बिनविरोध निवड; चार वर्षांत पाच उपनगराध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांनी अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेली गानवर्धन संस्था शास्त्रीय संगीत आणि नृत्यासाठी कलाकारांना सतत प्रोत्साहन देत असते. गानवर्धनतर्फे दरवर्षी विविध पुरस्कारही दिले जातात. शिष्यवृत्ती, युवा पुरस्कार, उदयोन्मुख कलाकार पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यातून सर्व स्तरातल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात गानवर्धन सतत प्रयत्नशील असते, असे संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात (Pune) सांगितले. ...