Team MyPuneCity – पुण्याच्या मुकुंदनगर येथील सुर्यमुखी चंदनी आंबा माता मंदिरात घुसून दानपेटीतील रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) अटक केली आहे.
महादेव तुकाराम गिरमकर (वय ४२, रा. कवठा विकास वाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि. २३ मे २०२५ रोजी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटीतील रोकड चोरून नेली होती. या घटनेनंतर मंदिर कमिटीच्या तक्रारीवरून स्वारगेट पोलीस (Swargate Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून येत होता. त्यानुसार तपास पथक सक्रिय झाले.
Yerwada Police : बसमधील सोनसाखळी चोरीचा गुन्हा उघडकीस; येरवडा पोलिसांकडून खराडीतील तरुण अटकेत
दि. ३० मे रोजी स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परिसरात तपास पथकातील (Swargate Police) पोलीस अंमलदार शंकर संपते व सागर केकाण यांना सीसीटीव्हीतील व्यक्तीशी मिळती-जुळती व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता तो महादेव गिरमकर असल्याचे समोर आले. त्याच्याकडील पिशवी झाकण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे पोलिसांनी पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्यामध्ये ३८,४०० रुपये रोख रक्कम, लोखंडी हातोडी, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर व ब्लेड अशा प्रकारची हत्यारे सापडली.
प्राथमिक चौकशीत त्याने मंदिर फोडीची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी सदर रोकड व हत्यारे जप्त करत गुन्हा उघडकीस आणला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे (Swargate Police) यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पो. उप-निरीक्षक रवींद्र कस्पटे, शैलेश आलाटे, पोलीस अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दीपक खंदाड, प्रशांत टोणपे, हनुमंत दुधे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.