Team My Pune City – स्वारगेट परिसरातील ( Swargate Crime News) गुलटेकडी येथे एका व्यावसायिकाच्या कार्यालयाचा दरवाजा फोडून चोरट्यांनी साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवार (दि.18) संध्याकाळी 7 ते शुक्रवारी (दि. 19) सकाळी 9.15 वा. या कालावधीत ही घटना घडली.
Robotex India National Championship : पुण्यात रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपचा भव्य प्रारंभ
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुळटेकडी येथील सुयोग सेंटर बिल्डिंगमध्ये ऑफिस क्रमांक 601 चे दरवाज्याचे दोन्ही कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडले. त्यानंतर आत प्रवेश करून लॉकर फोडण्यात आला. लॉकरमधून पाच लाख पन्नास हजार रुपये रोख, दोन हजार रुपयांची चांदीची नाणी आणि इतर महत्वाची कागदपत्रे असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरीस ( Swargate Crime News) गेला.
ही चोरी दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली. यामुळे गुलटेकडी व मार्केटयार्ड भागातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले . यावरून स्वारगेट पोलीस पुढील ( Swargate Crime News) तपास करत आहेत.