गृह राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटीची स्थापना
Team My Pune City –मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke) यांच्या हत्येचा कट मागील काळामध्ये उघडकीस आला होता. तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांचा सखोल तपास करण्यासाठी व या कटा मागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी शासनाकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड झोन दोनचे उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
Favourite Sher : मनाला आवडलेले शेर- भाग 10 वा
पिंपरी चिंचवड झोन दोनचे उपायुक्त विशाल गायकवाड हे समितीचे प्रमुख( Sunil Shelke) असणार आहेत. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस उप निरीक्षक रवींद्र खामगळ, पोलीस हवालदार अंकुश लांडे, सचिन बेंबाळे, सुनील सगर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या कट प्रकरणातील सात आरोपींना नऊ पिस्तूल, ४२ काडतुसे, कोयते अशा हत्यारांसह पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेले आरोपी पुणे, जालना, मध्य प्रदेश येथील गुन्हेगार आहेत. या आरोपींवर खून, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अटक करून त्यांच्याकडून चार पिस्तूल जप्त केले. त्यानंतर आणखी तिघांना अटक करून पाच पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली. त्यानंतर या आरोपींना फंडिंग करणाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली होती. हे गुन्हेगार मध्य प्रदेशात गेले. उत्तर प्रदेश मधील देवराज नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडून या आरोपींनी मध्य प्रदेश मधून हत्यारे आणली होती.
Diveghat : दिवेघाटात वाहतूक बंद; 26 सप्टेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत मार्ग बंद राहणार
हे आरोपी जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तळेगाव( Sunil Shelke) परिसरामध्ये दिसून आल्याबाबत तक्रार देखील दाखल झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये 4 जुलै रोजी लक्षवेधी उपस्थित करत या गंभीर विषयावर चर्चा करण्याची व तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या बाबीची एसआयटी मार्फत सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ही एसआयटी आता सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध घेणार आहे.
याविषयी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले ,( Sunil Shelke) वरील घटनेच्या अनुषंगाने माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे. ती सर्व माहिती या समितीला मी देणार आहे. समितीने या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करावा व याच्या मुळाशी कोण आहे त्याचा शोध घ्यावा असे सांगितले. तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीवर देखील रोख लावण्यासाठी कठोर अशी पावले उचलावीत, अशी मागणी देखील शेळके यांनी केली आहे.
तळेगाव दाभाडे या ठिकाणी यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अतिरिक्त तपास करण्यासाठी तसेच यामध्ये अन्य कुणाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का याचा सखोल तपास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आयुक्तांनी माझ्यावर सोपविली ( Sunil Shelke) आहे.
- विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २, पिंपरी-चिंचवड.