Team My pune city – काल ( दिनांक २३ जुलै रोजी) रात्री १०.३० वाजता, सिद्धबेट येथील नवीन पुलावर एक युवक पुलाच्या रेलिंगच्या बाहेरील बाजूस ( Suicide attempt ) बसलेला ( Suicide attempt) असल्याची माहिती अग्निशमन विभागास प्राप्त झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर संबंधित युवक कोणाशी तरी फोनवर रडत बोलत असल्याचे निदर्शनास आले.
Lokmanya Tilak Award : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरींना जाहीर, पुण्यतिथीदिनी वितरण
प्रसंगावधान राखत आणि शिताफीने काम करत, लिडिंग फायरमन प्रसाद बोराटे, फायरमन अमित घुंडरे, फायरमन इंद्रजित घुंडरे, फायरमन सिद्धार्थ गावडे, आणि वाहनचालक विनायक सोळंकी या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी सदर युवकाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात ( Suicide attempt ) यश मिळवले.
सदर युवकास सुरक्षितपणे खाली आणल्यानंतर त्याने नाव सांगून तो वडगाव घेनंद येथील रहिवासी
असल्याचेही स्पष्ट केले. तसेच, या परिसरात आपले नातेवाईक राहतात असेही तो वारंवार सांगत होता. त्यानंतर त्याने MH 12 VB 4659 क्रमांकाच्या प्रवासी रिक्षामध्ये बसून तो घरी जात असल्याचे सांगून घटनास्थळावरून निघून गेला.
याबाबत माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. या संपूर्ण माजी नगरसेवक सचिन गिलबिले, शुभम काटे, तुषार नेटके, ज्ञानेश्वर डिंडाळ यांचे ( Suicide attempt ) मोलाचे सहकार्य लाभले.अधिक माहिती अशी संबंधित इंद्रायणी नदी पुलावरील रेलिंग च्या बाहेर बसलेल्या त्या युवकाचा व्हिडिओ काढण्यात आला होता.व ते पालिकेला कळवण्यात आले.
तत्काळ मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून त्या युवकाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात यश मिळवता ( Suicide attempt ) आले.