Team My Pune City – फुरसुंगी परिसरातील एका खासगी अकादमीत ( Suicide) संरक्षणविषयक प्रशिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १०) दुपारी घडली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव अवधूत उल्हास बडे (वय १६, रा. हांडेवाडी, मूळ रा. आनंदनगर, बीड) असे आहे. अवधूत हा इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होता आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेशासाठी हांडेवाडीतील ‘यशोतेज’ या खासगी अकादमीत प्रशिक्षण घेत होता. सोमवारी दुपारी त्याने राहत्या खोलीत गळफास घेतल्याचे समोर आले.
हा प्रकार लक्षात येताच, सहकाऱ्यांनी आणि प्रशिक्षकांनी अवधूतला तत्काळ रुग्णवाहिकेने ससून रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील ( Suicide) तपास सुरू केला.
या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, अवधूत एनडीए प्रवेशासाठी काही महिन्यांपासून कठोर तयारी करत होता.
या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ( Suicide) सुरू आहे.


















