Team My Pune City – राज्यातील मद्याचे दर वाढल्यानंतर (State Excise Department)गोव्यातून बेकायदा मद्याची तस्करी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या दोन मोठ्या कारवायांमध्ये एक कोटी 65 लाखांहून अधिक किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांत सहा जणांना अटक केली असून, अवैध मद्य विक्री आणि मद्य तयार करण्याच्या साखळीचा पर्दाफाश झाला आहे.
गोव्यात मद्याचे दर तुलनेत कमी असल्याने आणि महाराष्ट्रात वाढत्या किमतीमुळे तस्करी वाढली आहे. ही तस्करी गुप्त मार्गाद्वारे; तसेच खासगी वाहतूक साधनांचा वापर करून केली जात असून, यात स्थानिकांचाही सहभाग असल्याचे दिसले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 11 जुलै रोजी सासवड विभागात वीर फाटा येथे केलेल्या कारवाईत मालवाहू वाहनातून गोवा बनावटीच्या रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या सुमारे 57 हजार 792 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभा मतदार संघात भव्य रक्तदान शिबीर संपन्न
Dehugaon:देहूत श्री संत तुकाराम अन्नदान मंडळाने केले खिचडी वाटप
याचे बाजारमूल्य सुमारे 1.15 कोटी रुपये असून, वाहन आणि इतर मुद्देमालासह एकूण जप्तीची किंमत 1.33 कोटी रुपये आहे. वाहनचालकास अटक केली असून, महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 जुलै रोजी दौंड विभागाने पाटस टोलनाक्याजवळ गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स कारमध्ये सापडले. उरुळी कांचन, चंदनवाडी, नांदूर आणि मोई येथे चार ठिकाणी छापे टाकून 84 बॉक्स मद्य, 4 हजार 779 वूच, रिकाम्या बाटल्या, मद्यनिर्मितीची मशिनरी, चार गाड्या आणि इतर साहित्य जप्त केले.