Team My Pune City – राज्य निवडणूक आयोगाने (SEC) राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षित जागांची संख्या निश्चित करणे ,त्या जागांचे संबंधित प्रभागांमध्ये वाटप करण्याचा आदेश नुकताच दिला होता. त्यानंतर आता या महापालिकांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रकही आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.
आयोगाचे सचिव सुरेश काका यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना आदेश जारी केले आहेत. 30 ऑक्टोबरपासून आरक्षणाशी संबंधित प्रक्रिया सुरू होणार आहे.
आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी प्रस्त सादर करण्याचा कालावधी 30 ऑक्टोबर ते नोव्हेंबर असा आहे.
आरक्षण सोडतीची जाहीर सूचना 8 नोव्हेंबरला वृत्तपत्र प्रसिध्द केली जाणार असून 11 नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत काढली जाईल.
आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल. प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिध्द करण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे. तर हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर.
प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून महापालिका आयुक्त अंतिम आरक्षणाबाबत 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत निर्णय घेतील.
आयोगाच्या मान्यतेनंतर 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाईल असे आयोगाच्या वेळापत्रकामध्ये नमूद करण्या आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या मतदारयाद्या अंतिम करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच दुबार मतदारांवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
- 30 ऑक्टोबर – 4 नोव्हेंबर: आरक्षित जागांचा प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी •
8 नोव्हेंबर: आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रात
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न! - Pune : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रामटेकडी येथे फटाके फोडण्यावरून हाणामारी; एकाचा मृत्यू, एक आरोपी अटक
- 11 नोव्हेंबर: आरक्षण सोडतीचा दिवस •
17 नोव्हेंबर: प्रारूप आरक्षण प्रसिद्धी •
24 नोव्हेंबर: हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख
- 25 नोव्हेंबर – 1 डिसेंबर: हरकतींचा विचार व अंतिम आरक्षणाचा निर्णय
- 2 डिसेंबर: अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध


















