Team My Pune City – येत्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा देणारी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ( MSRTC )यांनी गुरुवारी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणपतीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून एकेरी गट आरक्षणावर अतिरिक्त 30 टक्के भाडे आकारले जाणार नाही. ही भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय राज्य परिवहन विभागाने घेतला आहे.
Cab Driver : ऑटो-टॅक्सी चालक-मालकांना कायदेशीर लढ्यासाठी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन- डॉ. बाबा कांबळे
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्याची प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) विविध जिल्ह्यांतून कोकणासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करते. परंतु गेल्या वर्षी अनेक प्रवाशांकडून केवळ एकेरी ( MSRTC ) म्हणजेच कोकणकडे जाण्यासाठीच बस आरक्षित करण्यात आल्या होत्या. परिणामी परतीच्या मार्गावर बस रिकाम्या परत आणाव्या लागल्याने एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर महामंडळाने एकेरी गट आरक्षणासाठी तिकीट दरात 30 टक्के वाढ लागू केली होती.
मात्र, यंदा ही वाढ रद्द करून नागरिकांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा देण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटी महामंडळ गेली 77 वर्षांपासून विश्वासार्ह आणि किफायतशीर सेवा देत आहे. गणपती, आषाढी, होळी अशा सणांच्या वेळी प्रवाशांच्या मागणीनुसार पुरेशा बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येतात. शासनाने जाहीर केलेल्या सर्व सवलती (ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी) यावेळीदेखील लागू ( MSRTC ) असणार आहेत.”
राज्यातून कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांमुळे स्थानिक पातळीवर तात्पुरती बस कमतरता भासते. त्यामुळे महामंडळाला नियोजन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तरीही यंदा आर्थिक नुकसानाचा धोका पत्करून प्रवाशांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि परतीच्या प्रवासाचेही आगाऊ आरक्षण करावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले ( MSRTC) आहे.