situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Srujanyatri : ‘सृजनयात्री’त नवनिर्मित बंदिशींचा सुरेल प्रवास

Published On:
Srujanyatri

Team My Pune City – किराणा, मेवाती आणि ग्वाल्हेर घराण्यांच्या गायनशैलींचा सुरेल मिलाफ साधत ‘सृजनयात्री (Srujanyatri) ’ या कार्यक्रमात नवनिर्मित बंदिशींचा अनोखा अनुभव पुण्यातील रसिकांना मिळाला. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता येथील गणेश सभागृहात पार पडलेल्या या मैफिलीत शास्त्रीय संगीताच्या नव्या वाटा खुल्या झाल्या.

कार्यक्रमाची सुरुवात सुयोग कुंडलकर यांनी रचलेल्या राग (Srujanyatri) सांझमधील ‘ए री भयी सांज सखी री’ या रूपक तालातील बंदिशीने झाली. त्यानंतर आरती ठाकूर-कुंडलकर यांनी ‘अब तो मोरी मान ले ओ सावरिया’ ही तीन तालातील रचना सादर करत तराणा सादर केला. सचिन नेवपुरकर यांनी राग रागेश्री मधील ‘आली रि जियरा’ ही झपतालातील बंदिश सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Pune Metro : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो लाईन टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची आयटी कर्मचाऱ्यांची मागणी

सुयोग कुंडलकर यांनी गोरख, सोहोनी, रसवंती आणि यमन या रागांवर आधारित बंदिशी रचल्या. ‘अब तुमी सो लगन ला’, ‘जी न जाओ रे बलवमा’, ‘मानत नाही करत बरजोरी’, ‘झनन झनन बाजे पैंजन सखी’ या रचनांचे आरती ठाकूर-कुंडलकर यांनी सुमधुर सादरीकरण केले. त्याचप्रमाणे सचिन नेवपुरकर यांनी राग रागेश्री, मारुबिहाग, सोहोनी, यमन आणि दिन की पूरिया या रागांवर आधारित बंदिशी सादर करत आपल्या गायनातून गहन भावविश्व उभे (Srujanyatri) केले.

Hyundai’s Talegaon project : ह्युंदाईचा तळेगाव प्रकल्प; ११ हजार कोटींची गुंतवणूक, हजारो जणांना रोजगाराची संधी

सोहोनी रागाच्या सादरीकरणात दोन्ही बंदिशकारांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून रचना सादर केल्या. सचिन नेवपुरकर यांनी ‘पार करन दे हो नैय्या’ या आग्रा घराण्याच्या शैलीतील बंदिशीत गुरुविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. तर सुयोग कुंडलकर रचित ‘जी न जाओ रे बलवमा’ आणि ‘काहे समझत नाही मोरा मनवा’ या बंदिशी सादर करताना आरती ठाकूर-कुंडलकर यांनी विरहिणीच्या भावनांना (Srujanyatri) स्वररूप दिले.

जन संमोहिनी रागातील ‘दुर्गे महारानी वरदानी’ या भक्तिपूर्ण बंदिशीच्या सादरीकरणातून भक्ती आणि शक्तीचा सुरेल संगम साधण्यात आला. ‘शाम को तिलक भाल’ या रागमालेतून सुयोग कुंडलकर यांनी सुमारे २१ रागांचे समर्पक दर्शन (Srujanyatri) घडविले.

कार्यक्रमाची सांगता सचिन नेवपुरकर यांनी भैरवी रागातील होरीने केली. ‘करत है मनमानी श्याम कन्हाई’ आणि ‘चलो री चलो री सखी पकड कान्ह को’ या रचनांतून कृष्ण-गोपिकांच्या अवखळपणाचे चित्रण रसिकांसमोर साकारले.संवादिनीवर सुयोग कुंडलकर आणि तबल्यावर ऋषिकेश जगताप यांनी समर्पक साथसंगत करत मैफिलीत रंग भरला. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन प्रतिमा कुलकर्णी (Srujanyatri) यांनी केले.

Follow Us On