situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

SPM School : शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळेचा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

Published On:
SPM School

Team My pune city – 15 ऑगस्ट शुक्रवार रोजी शिक्षण प्रसारक मंडळीच्या (SPM School) निगडी शाळेचा स्वातंत्र्य दिन सोहळा शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून यशोवर्धन उर्फ आण्णा वाळिंबे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत प्रचारक पश्चिम प्रांत), तसेच भारतीय सैनिक दलात सेवेत असलेला शाळेचा माजी विद्यार्थी नरेंद्र शेखावत यांना आमंत्रित करण्यात आले होते.

शाळा समिती अध्यक्ष ॲड दामोदरजी भंडारी ,शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेचे पालक शिक्षक संघ प्रतिनिधी, सर्व पालक व विद्यार्थी यांच्या (SPM School) उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील कब बुलबुल च्या विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथी यांना मानवंदना दिली.

Vadgaon Maval : सामाजिक कार्यकर्ते अशोक घोजगे यांचे निधन


माजी विद्यार्थी नरेंद्र शेखावत यांनी आपल्या शालेय जीवनाला (SPM School) उजाळा देत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपल्या भावनिक, शारीरिक व सामाजिक विकास याची योग्य सांगड घालून आपला सर्वांगीण विकास कसा करावा, तसेच या वयातच विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले तर त्याला शाळेचे शिक्षक व पालक योग्य मार्गदर्शन करू शकतात. शाळेच्या शिक्षकांनी केलेला मार्गदर्शन आणि आपले सातत्यपूर्ण प्रयत्न व चिकाटी यातून हळूहळू माणूस आपले ध्येय साध्य करू शकतो याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Alandi : श्रीकृष्ण व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा


प्रमुख अतिथी यशोवर्धन वाळिंबे यांनी आपल्या भाषणातून , (SPM School) भारताचे स्वतंत्र टिकवून ठेवण्यासाठी आत्ताच्या पिढीने शालेय जीवनापासूनच कोणते प्रयत्न करावेत. तसेच आपल्या देशामध्ये आपल्या समोर ज्या समस्या आहेत त्यानुसार कसे मार्गक्रमण केले पाहिजे आणि आपला देश उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत कारण मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ती आपण सर्वजण आपल्या शाळेतील मार्गदर्शक शिक्षक, पालक यांच्या मार्गदर्शनाने पार पाडूया याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

शाळेतील विद्यार्थिनी अक्षदा देवकाते ( मराठी माध्यम), विद्यार्थी विवेक बालसुनी ( इंग्रजी माध्यम),शिक्षिका वैशाली खरबूडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेतील विदयार्थी यांनी देशभक्तीपर गीत गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रिया साळवे यांनी केले.पाहुणे परिचय (SPM School) शिक्षिका रंजना चौधरी यांनी करून दिला व आभार जयश्री कुलकर्णी यांनी मानले . कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन शाळा समिती अध्यक्ष ॲड दामोदरजी भंडारी यांनी केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सविता बिराजदार( मराठी माध्यम),पल्लवी शानभाग ( इंग्रजी माध्यम). यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व शिक्षक, पालक , विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे (SPM School) यशस्वी झाला.

Follow Us On