Team My pune city – शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी व इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात (SPM) आली. गुरुपौर्णिमा हा गुरूंच्या कृतज्ञतेचा सन्मानाचा एक पवित्र सण मानला जातो. आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या मार्गदर्शकांना आदरांजली देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. तसेच महाभारताची रचना करणारे महर्षी वेद व्यास यांची देखील जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
Dahiwale Crime News : दहिवलेमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाला टोळक्याकडून मारहाण

गुरुपौर्णिमा या पवित्र दिनाचे औचित्य साधून शाळेत गुरुपूजन करण्यात आले. मागील वर्षीचे तसेच या वर्षीचे पालक प्रतिनिधीं यांचे त्यांच्या पाल्याकडून पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. सविता बिराजदार याचे पालक प्रतिनिधींकडून पूजन करण्यात आले. तसेच सर्व शिक्षकांचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला.
SPM : शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी व इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनीं वैभवी हजगुडे, स्वरा पाटील यांनी केले. गुरुपौर्णिमा बद्दल माहिती श्री रवींद्र मुंगसे सर यांनी सांगितली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी प्रार्थना म्हटली. व आभार प्रदर्शन शीतल महांकाळे यांनी केले. शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदरजी भंडारी यांच्या संकल्पनेतून तसेच मा.मुख्याध्यापिका सौ.सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यम शाळेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेमध्ये श्री पद्मनाभन आणि सौ. जयश्री पद्मनाभन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मा. प्राचार्य सौ. पल्लवी शानभाग यांनी केले.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मा. प्राचार्या सौ.पल्लवी शानभाग आणि पर्यवेक्षिका सौ.अमृता करनील यांचा सत्कार केला. गुरुपौर्णिमा विषयी माहिती सौ. दिपाली घाडगे आणि अश्विनी महाजन यांनी सांगितली.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सौ. जयश्री पद्मनाभन यांनी गुरूंची महती सांगून आपल्या आयुष्यामध्ये गुरुस्थानी असलेल्या सर्व मान्यवरांविषयी कृतज्ञता बाळगून पाहिजे असे सांगून विष्णुसहस्त्रनामा विषयी महत्व सांगितले. शाळेच्या माननीय प्राचार्य सौ. पल्लवी शानभाग यांनी आयुष्यातील ओंकाराचे महत्त्व सांगून ओम या मंत्राचे उच्चारण करून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी ऋषिकेश अय्यर आणि श्लोक पुराणिक यांनी केले. शांतीपाठ आणि प्रार्थना शुभांगी डोंगरे यांनी म्हणली.
शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.