Team My Pune City – श्रावण महादेवाची भक्ती (Somnath Mahadev)करण्याचा पवित्र महिना तसे तर आपण १२ हि महिने देवाची भक्ती करतो पण या महिन्यास विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. अशा या श्रावणात आपण १२ ज्योतिर्लिंगाची माहिती पाहणार आहोत.
संपूर्ण भारतामध्ये महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यातील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर वसलेले सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते.
Mahadev Puja Rituals: श्रावण विशेष – महादेवाची पूजा विधी आणि आरत्या
शिवपुराणातील माहिती नुसार, प्रजापती दक्ष यांना २८ मुली होत्या. या मुली म्हणजे नक्षत्र होय. दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते. चंद्रदेवाला त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नीसर्वाधिक प्रिय होती. ही गोष्ट चंद्रदेवाच्या इतर पत्नींना आवडली नाही. त्यांना या गोष्टीचा त्रास व्हायचा. एक दिवस त्यांनी ही गोष्ट वडील दक्ष यांना सांगितली, त्यानंतर दक्ष यांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींना समान वागणूक देण्यास सांगितले होते.परंतु चंद्रदेव यांनी ऐकले नाही. तेव्हा क्रोधीत होऊन दक्ष यांनी चंद्रदेवाला क्षय रोग होण्याचा शाप दिला होता.
या शापामुळे चंद्रदेवाची शक्ती क्षय होऊ लागली.या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी चंद्राने शिव भक्ती केली. त्यांनी अरबी समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली. चंद्रदेवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले. चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले.त्यालाच सोमनाथ महादेव म्हणतात. हेच १२ ज्योतिर्लिंगांतील पहिले ज्योतिर्लिंग होय.

सोमनाथ येथे त्रिवेणी संगम आहे. त्यात कपिला, हिरण आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम