Team MyPuneCity — सध्या पुणे परिसरात सुरू असलेल्या (Sinhgad Fort) अतिवृष्टीमुळे सिंहगड किल्ल्याजवळ दरड कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला असून, आज, गुरुवार, दिनांक २९ मे २०२५ रोजी सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे वन विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच याच दिवशी होणाऱ्या आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बंदीमध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. तसेच कल्याण दरवाजा, आतकरवाडी तसेच अन्य सर्व पायी मार्गांनी प्रवेश पूर्णतः बंद ठेवण्यात (Sinhgad Fort) आला आहे.
सिंहगड परिसरातील नागरिक, पर्यटक आणि ट्रेकर्स यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक यांनी केले आहे.
प्रशासनाकडून पुढील परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल आणि किल्ला पुन्हा कधी खुला करण्यात येईल याची माहिती लवकरच देण्यात येईल, असेही सांगण्यात (Sinhgad Fort) आले आहे.