situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Siddharth Shirole:कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या प्रयत्नातून राज्य विकासाच्या मार्गावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन

Published On:
Siddharth Shirole

बोपोडी येथील पाणी साठवण टाकीचे लोकार्पण

Team Pune City –स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून(Siddharth Shirole) करण्यात येणारा पाठपुरावा, त्याला मिळणारी लोकप्रतिनिधींची साथ, मंत्री व खुद्द मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आबेडकर हॉकी स्टेडीयम चिखलवाडी, बोपोडी येथे समान पाणी पुरवठा प्रकल्पा अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या ३० लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाकीचे उद्घाटन आज (दि. १०) आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या च्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, माजी नगरसेका सनी निम्हण , रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे , शिवाजीराव मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम , माजी नगरसेवक आनंद छाजेड, दलीत पँथर चे अध्यक्ष यशवंत नडगम , खडकी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अभय सावंत, सामजिक कार्यकर्ते बाळासाहेब रांनवडे , बी एल येडे , ॲड सुनील जपे ॲड रीटा उपाध्याय , शहाबुद्दीन काजी, राजेश अग्रवाल, खडकीचे पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम, श्याम काची, योगेश करनूर, अमित मोहिते, अप्पासाहेब वाडेकर, अनिल जोशी, सादिक शेख यांच्यासह परिसरातील विविध सोसायट्यांचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते.

Alandi: श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव व गोकुळाष्टमी उत्सवाचा उत्साहात प्रारंभ


Vadgaon Maval:कृष्णराव भेगडे यांचे कार्य मावळच्या इतिहासातील सुवर्णपान

पुढे बोलताना शिरोळे म्हणाले, विकासाची ही गती यापुढेही कायम ठेवली जाणार असून बोपोडी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम साठी राज्य शासन आणि महापालिकेकडून निधी उपलब्ध करून देऊन खेळाडूंसाठी अध्ययवत सुविधा उभारल्या जातील. त्याचप्रमाणे या परिसरातील रुग्णालयांना अत्याधुनिक स्वरूप प्राप्त करून देऊन नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचा संकल्प असल्याचे शिरोळे यांनी यावेळी सांगितले.

या परिसराच्या विकासात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे संघटक सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीताबाई वाडेकर यांचे मोठे योगदान असल्याचा उल्लेखही शिरोळे यांनी आवर्जून केला. विशेषतः जनसेवेसाठी सुनीताताई यांची जिद्द आणि आत्मीयता प्रभावित करणारी ठरली, असेही त्यांनी नमूद केले.

महायुती सरकारच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या साथीने स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत विकास आणि वेग घेतला असून विरोधक दीर्घकाळ विरोधातच राहतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रास्ताविक करताना परशुराम वाडेकर म्हणाले, लोकप्रतिनिधी असून देखील गेली आठ वर्ष आमच्या घरात टँकर चे पाणी येत आहे. त्यामुळे पाण्याची या भागात किती गरज आहे याची जाणीव झाली. त्यामुळे वैयक्तिकरीत्या पाठपुरावा करून बोपोडी भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले. या कामात येथील सर्वपक्षीय नगरसेवकांची मदत झाली. असे सांगत या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्याप्रमाणेच येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम हे देखील आमच्या जिव्हाळ्याचे आहे. त्याचा प्रश्नही सोडवावा ही विनंती शिरोळे यांना वाडेकर यांनी यावेळी केली.

सनी निम्हण म्हणाले, गेली आठ, नऊ वर्ष वाडेकर यांच्या कडून चिकाटीने बोपोडी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आज राखीपोर्णिमेच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून येथील महिला भगिनींना ओवाळणी मिळाल्याचा आनंद आहे.

आनंद छाजेड म्हणाले, सुरवातीला बोपोडी भागात 24 तास पाणी येत होते. पण कालांतराने लोकसंख्या वाढली. अन् पाणी हळू हळूहळू कमी येऊ लागलं. मात्र आता या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून येथील रहिवाश्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

सूत्रसंचालन ॲड. ज्ञानेश्र्वर जावीर यांनी केले, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.

Follow Us On