Team My Pune City – श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या वार्षिक अधिकारी व कर्मचारी गुणगौरव सोहळ्यात, शाखा-खराडी (पुणे) येथील शाखाधिकारी दत्तात्रय अंकम यांना उत्कृष्ट शाखाधिकारी म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा सन्मान सोहळा संस्थेच्या ९ राज्यांतील १३९ शाखांमधून निवडलेल्या गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
Sunil Shelke : जनसंवाद अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या समस्या ऐकून उपाययोजना सुरू
याप्रसंगी कर्मचाऱ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना दत्तात्रय अंकम यांनी श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को. ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव हे वेळोवेळी मार्गदर्शन, प्रोत्साहन व प्रशिक्षण देवून कर्मचाऱ्यांचे व्यक्तिमत्व घडवतात, यामुळेच आम्ही कर्मचारी ( Shri Renuka Mata Multistate Society ) ग्राहकांना चांगली सेवा देवून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याचे सांगितले असून त्यांच्या प्रेरणादायी व शिस्तबद्ध संस्थेत आम्ही काम करतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे आणि यापुढेही सातत्याने कामाची गती वाढवून रेणुकामाता मल्टिस्टेटची आणखी प्रगती करणार असल्याचे सांगितले.
यावेळी ह.भ.प. आदिनाथ शास्त्री महाराज, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, मसाप चे कार्यवाह जयंत येलूलकर, ॲड. नितीन भालेराव आदी मान्यवर ( Shri Renuka Mata Multistate Society ) तसेच रेणुकामाता परिवारातील सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार व कर्मचारी उपस्थित होते.