Team My Pune City -क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,(Shri Dnyaneshwar Vidyalaya)जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, खेड तालुका क्रीडा संघटना व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोहकल यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल (रोहकल) चाकण येथे संपन्न झाल्या.
सदर स्पर्धेमध्ये आळंदी मधील ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील (Shri Dnyaneshwar Vidyalaya)14 वर्ष वयोगटा खालील मुलीमध्ये श्रावणी इतिराज लोहोर व 17 वर्ष वयोगटा खालील मुलीमध्ये अनिशा अरविंद शिंदे या दोन खेळाडू विद्यार्थिनींची लोणीकंद या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच चुरशीच्या या बुद्धिबळ स्पर्धेत इतर खेळाडू विद्यार्थ्यांनीही कौशल्यपूर्ण खेळ दाखविला.
Vadgaon Maval News : वडगावात विद्यार्थी बनले मूर्तिकार
Astrological convention : ज्योतिष अधिवेशनात विलास बाफना यांचा सत्कार
या यशस्वी खेळाडू ,मार्गदर्शक – पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे , विठ्ठलदास गुट्टे, राजश्री भुजबळ यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश पवार, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.