Team My Pune City – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य (Shri Dnyaneshwar Vidyalaya)पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व खेड तालुका क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल राजगुरुनगर या ठिकाणी तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धा शुक्रवार दि.12 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाल्या.
सदर स्पर्धेमध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या 4 खेळाडूंची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये 17 वर्ष वयोगटामध्ये मुले 200 मी. धावणे स्पर्धेमध्ये तुकाराम प्रल्हाद पिंपळे, 400 मी. धावणे स्पर्धेमध्ये समाधान चंद्रसेन नागरगोजे तसेच गोळाफेक मध्ये भूषण अशोक जगताप तर थाळी फेक मध्ये भूषण अशोक जगताप या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. थाळीफेक मध्ये राम मोहन मोरे यास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
4*100 रिले या क्रीडा प्रकारात तुकाराम प्रल्हाद पिंपळे, समाधान चंद्रसेन नागरगोजे, श्रेयस संतोष वाघमारे, रघुवीर मोरे या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
Pune Crime News : वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन जण अटकेत
Talegaon Dabhade: नगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय सुरू;गोल्डन रोटरीचा अभिनव उपक्रम
या सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश पवार, साहेबराव वाघुले, श्रीरंग पवार, राजश्री भुजबळ, कांबळे वाय.एस. कु. शुभम वाजे या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर व संस्थापदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य पर्यवेक्षिका, क्रीडा विभाग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून जिल्हास्तरावरील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा दिल्या.