Team MyPuneCity –विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून वीज निर्मितीसाठी नैसर्गिक स्रोतांचा वापर करून पर्यावरणाचे जतन करण्याच्या उद्देशाने सौर ऊर्जा प्रकल्प आणि बेघर लोकांना घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हॅबिटॅट इंडिया ही एनजीओ कंपनी करते.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन कंपनीचे विभागीय व्यवस्थापक बुरानउद्दीन बोहरा आणि प्रोग्रॅम मॅनेजर सतीश जाधव यांच्या सहकार्याने 10kw क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी संस्थेत करण्यात आली.
शालेय शिक्षणाबरोबरच किर्तन, प्रवचन, गायन, वादन या अध्यात्मिक शिक्षणासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या वारकरी सांप्रदायिक विद्यार्थ्यांबरोबर गोरगरीब शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात विजेची टंचाई जाणवू नये यास्तव झारखंड येथील रॉकवेल ऑटोमोशन कंपनीच्या सीएसआर फंडातून ही मदत करण्यात आली.
गोरगरीब तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या 100 विद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची भूमी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून जडणघडणीमध्ये समाजामध्ये विद्यालयाचे असणारे योगदान, सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी असणारी तळमळ या सर्व निकषांच्या आधारे विद्यालयाची निवड करून ही महत्वपूर्ण मदत करण्यात आली.
Talegaon Dabhade:श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Pune Terrorist Case : पुण्यातील घातपात प्रकरणातील संशयित दहशतवाद्याला अटक

विद्युत निर्मिती बरोबरच शालेय अभ्यासक्रमामध्ये सौरऊर्जेचा अंतर्भाव असल्याने प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षण मिळण्यासाठी हा प्रकल्प विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी कंपनीचे टेक्निशियन राहुल सागर यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विश्वस्त एल. जी. घुंडरे ,प्राचार्य एस .जी .मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्या वतीने राहुल सागर यांचा सन्मान ह.भ.प. शेखर जांभुळकर ,भारती सहकारी बँकेचे अध्यक्ष व राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सीए बी.बी. कड साहेब, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील यांच्या हस्ते करून कंपनीचे ऋण व्यक्त करण्यात आले.