Team MyPuneCity-‘ही श्रींची इच्छा’ या गाजलेल्या आत्मचरित्राचे लेखक, यशस्वी मराठी उद्योजक, वैज्ञानिक आणि अमेरिकेतील यशस्वी राजकारणी आणि पहिले मराठी खासदार श्री ठाणेदार (Shree Thanedar) यांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, गर्जे मराठी ग्लोबल, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ आणि रुरल आंत्रप्रिन्युअर कनेक्ट इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने हा संवादात्मक कार्यक्रम गुरुवार, दि. 29 मे रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
Alandi: इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ;भक्ती सोपान पूल पाण्याखाली
अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तीमत्त्व श्री ठाणेदार (Shree Thanedar) हे अमेरिका संसदेतील पहिले मराठी खासदार असून मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य म्हणून कार्यरत होते. सध्या मिशिगनच्या 13व्या काँग्रेसनल जिल्ह्यातून प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत.
श्री ठाणेदार यांच्याशी कॉमसेन्स टेक्नॉलॉजीज्चे अध्यक्ष सागर बाबर आणि महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर संवाद साधणार आहेत. या संवादात्मक कार्यक्रमातून उद्योग, व्यवसाय, साहित्यविश्व आणि भारत-अमेरिका यांच्यातील सध्याच्या संबंधावर प्रकाश टाकला जाणार आहे.
बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात, अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडले, सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू
या कार्यक्रमात अंतर्गत आयोजिक संस्थांच्या वतीने श्री ठाणेदार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
