Team My pune city – घर बांधण्यासाठी आणि नवीन दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यावरून एका महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ ( Pimpri Chichwad Crime News 29 July 2025) करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छळाची घटना २०२० पासून २८ जुलै २०२५ या कालावधीत ज्योतिबा नगर काळेवाडी येथे घडली. विवाहितेने 28 जुलै रोजी राहत्या घरात आत्महत्या केली.
निर्मला परमेश्वर वाघमारे (३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणात प्रकाश दादाराव वाघमारे (३३, तळवडे, पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती परमेश्वर श्रावण वाघमारे (४०, जगळपूर, लातूर), सासू गवळणबाई श्रावण वाघमारे (जगळपूर, लातूर), दीर कमलाकर श्रावण वाघमारे (जगळपूर, लातूर), नणंद रमाबाई लेंडेगावकर (जगळपूर, लातूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मयत बहीण निर्मला वाघमारे (३०) हिचा आरोपी परमेश्वर याच्या सोबत विवाह झाला. त्यानंतर जेमतेम तीन वर्षांनंतर आरोपींनी आपसात संगनमत करून बहिण निर्मला हिला प्रापंचिक कारणावरून घालून पाडून बोलले. घर बांधण्यासाठी आणि नवीन दुचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याबाबत तिला वेळोवेळी सांगितले. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. बहीण कामाला जाऊ लागल्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपींनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने राहते घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
Crime News : कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून वाद, विद्यार्थ्यावर कोयत्याने वार
खंडणीसाठी नारळ विक्रेत्याला धमकी, मारहाण आणि तोडफोड ( Pimpri Chichwad Crime News 29 July 2025)
नारळाच्या गोडाऊनमध्ये एका नारळ विक्रेत्याला खंडणीसाठी धमकावण्यात आले. त्याला मारहाण करून गोडाऊनची तोडफोड करण्यात आली. ही घटना १५ जून ते २७ जुलै या कालावधीत नढेनगर काळेवाडी येथे घडली.
या प्रकरणात बसवराज मलाप्पा घोडके (४३, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव नांजरकर (३२, काळेवाडी) आणि इतर आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव याने फिर्यादीला फोन करून “तू नारळाचा व्यवसाय करतोस आणि तुझ्या गाड्या गोडाऊनसमोर लावतोस, त्यासाठी खंडणी म्हणून साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील” असे सांगितले. आरोपी वैभव याने ऑनलाइन माध्यमातून ९० हजार रुपये घेतले. त्याने फिर्यादीच्या गोडाऊनच्या गेटवर दगड मारून आणि ॲरो ॲक्वा प्लांटचे नळ तोडून नुकसान केले आहे. इतर आरोपींनी फिर्यादीला लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. आरोपी कारमधून गोडाऊनच्या आतमध्ये जबरदस्तीने आले आणि फिर्यादीला शिवीगाळ करून पैशांची मागणी केली व पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एका व्यक्तीने हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या दिशेने उगारून “आताच पैसे दे नाहीतर तुला बघून घेऊ” अशी धमकी दिली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी ( Pimpri Chichwad Crime News 29 July 2025)
शेलपिंपळगाव येथे नदीच्या पुलावर एका अज्ञात कंटेनरच्या धडकेने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (२८ जुलै) सकाळी साडेदहा वाजता घडली.
उषा दीपक खोत (२८) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जखमी पती दीपक दगडू खोत (२९, काळूस) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात कंटेनरवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक आणि त्यांची पत्नी उषा ही दुचाकीवरून शेलपिंपळगाव येथे दवाखान्यात जात होते. शेलपिंपळगाव येथील नदीच्या पुलावर आले असता एका अज्ञात कंटेनरने फिर्यादीच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येऊन धडक देऊन अपघात केला. या अपघातात फिर्यादीची पत्नी उषा यांचा मृत्यू झाला. फिर्यादींना गंभीर दुखापत झाली आणि दुचाकीचे नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. चाकण पोलीस तपास करत आहेत.
Jambhulwadi:जांभूळवाडी येथे वाहनाच्या धडकेत लोखंडी हाईटगेज तुटले, मोठ्या वाहनाना बंदी
बसची कारला धडक, १२ वर्षीय मुलगा जखमी ( Pimpri Chichwad Crime News 29 July 2025)
मोशी गावच्या हद्दीत स्पाईन चौकात एका बसने कारला धडक दिली. या अपघातात १२ वर्षांच्या मुलाला दुखापत झाली आणि कारचे नुकसान झाले. ही घटना रविवारी (२७ जुलै) मध्यरात्री १२:१५ वाजताच्या सुमारास घडली.
शमित मनीष गायकवाड (१२) असे जखमी मुलाचे नाव आहे. या प्रकरणात मनीष सुभाष गायकवाड (४५, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बस (एमएच १४/एल के ७६७६) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष, त्यांची पत्नी आणि मुलगा शमित असे कार घेऊन स्पाइन रोडने जात असताना, चिखली बाजूकडून आलेल्या बसने कारला डाव्या बाजूच्या मागील दरवाज्यास धडक दिली. अपघातात मुलगा शमित याच्या खांद्याला व मानेला मार लागला असून अंतर्गत दुखापत झाली आहे. तसेच कारचे नुकसान झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक ( Pimpri Chichwad Crime News 29 July 2025)
बेकायदेशीररित्या पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (२८ जुलै) दुपारी विशाल नगर, पिंपळे निळख येथे करण्यात आली.
कुणाल शिवाजी पुरी (२०, धायरी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल रवी पवार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल पुरी याने त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्टल बाळगले. त्याबाबत गुन्हे शाखा युनिट चारला माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे १ पिस्टल आणि १ जिवंत काडतुस जप्त केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.