Team My Pune City – शिवाजीनगर मेट्रो स्थानक परिसरात ( Shivajinagar Crime News) मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने गोंधळ घालत पोलीस शिपायाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा जणांना अटक केली.
MPSC : राज्य लोकसेवा आयोगाच्या मुलाखती ११ ते २७ नोव्हेंबर दरम्यान
या प्रकरणी पोलीस शिपाई अक्षय डिंडोरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नाना बापू नाईकनवरे (२४), सनी मुकेश नाईकनवरे (२२, दोघे रा. एसआरए वसाहत, विमाननगर), दक्षेश विठ्ठल कुरपे (२४, रा. सरगम सोसायटी, वारजे जकात नाका), गणेश संजय तुपसौंदर (२२, रा. कुंभारवाडा चौक, कसबा पेठ), विकी कारंडे (२४, रा. बराटे चाळ, कर्वेनगर) आणि सार्थक कदम यांचा समावेश( Shivajinagar Crime News) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी रात्री कामगार पुतळा परिसरात थांबले होते. त्यांनी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याबाबत माहिती मिळताच पोलीस शिपाई डिंडोरे घटनास्थळी गेले आणि त्यांनी आरोपींना गोंधळ थांबवण्यास सांगितले. मात्र, आरोपींनी त्यांच्याशी उर्मट वर्तन करत धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ ( Shivajinagar Crime News) केली.
या प्रकारानंतर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की करणे आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील ( Shivajinagar Crime News) करत आहेत.


















