Team My Pune City – शिवाजीनगर न्यायालयाच्या इमारतीवरून ( Shivajinagar Court suicide News) उडी मारून एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. १९९७ पासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादामुळे दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रिया भोगत असल्याने ते नैराश्यात होते, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
Pune Road : खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त पुणेकर; गल्लीबोळांच्या दुरुस्तीवर भर द्यावा – संदीप खर्डेकर
मृत ज्येष्ठाचे नाव नामदेव यशवंत जाधव (वय ६१, रा. वडकी, हडपसर-सासवड रस्ता) असे आहे. दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वडकी गावात त्यांची जमीन असून, १९९७ पासून त्या जमिनीवरून त्यांचा वाद न्यायप्रविष्ट आहे. या दीर्घकाळ चाललेल्या प्रक्रियेमुळे ते मानसिक तणावाखाली होते.
बुधवारी (दि.१५) सकाळी ते शिवाजीनगर न्यायालयात आले आणि नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्यासह पथकाने घटनास्थळी ( Shivajinagar Court suicide News) धाव घेतली.
जाधव यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शिवाजीनगर पोलिसांनी ( Shivajinagar Court suicide News) या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.