जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचा विधिमंडळ कामकाजात वाचाळ वीर मंत्री संजय शिरसाठ यांनी एकेरी शब्दात उल्लेख केल्याने वीरशैव लिंगायत समाज संतप्त.
Team My pune city – विधीमंडळ मुंबई येथे चालू (Shiva Organization) असलेल्या अधिवेशन दरम्यान सभागृहात क्रांतीसुर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर अर्थिक विकास महामंडळा बाबत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देतांना मंत्री संजय शिरसाट यांनी अतिशय हलक्या फुलक्या भाषेत क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा एकेरी उल्लेख बसवेश्वर असा केला.
Pimpri: सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सन्मानित
त्यामूळे शिवा संघटनेचे (Shiva Organization) संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहर धोंडे सर मंत्री संजय शिरसाट यांनी जर जाहीर माफी मागावे असे आवाहन केले आहेअन्यथा महाराष्ट्रात सर्वत्र जाहीर निषेध केला जाईल तसेच मंत्री संजय शिरसाट यांचा पुतळा जाळण्यात येईल व जोडे मारो आंदोलन केले जाईल.
त्याचाच एक भाग म्हणुन शुक्रवार दिनांक १९ जुलै रोजी शिवा संघटनेचे (Shiva Organization) राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत आप्पा शेट्टे , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनील आप्पा वाडकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मारोती नागसाखरे पिंपरी शहर अध्यक्ष अनिल बोचरे , यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड येथील क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्या जवळ वाचाळवीर मंत्री संजय शिरसाट यांचा तीव्र शब्दात जाहिर निषेध करण्यात आला व भविष्यात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असे उमाकांत शेटे यांनी सांगितले.
यावेळी शिवा संघटनेचे आळंदी शहर अध्यक्ष सदाशिव साखरे, उपाध्यक्ष सोमनाथ साखरे, पिंपरी शहर उपाध्यक्ष संतोष नुच्चे, संपर्क प्रमुख सूर्यकांत हिप्परगे, सोशल मीडिया अध्यक्ष शिवानंद चौगुले, तसेच मोठ्या संख्येने शिवा मावळे महात्मा बसवेश्वर प्रेमी व समाज बांधवांच्या उपस्थितीत (Shiva Organization) होते.