Team My Pune City -शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अवघ्या ८ दिवसांत चार अट्टल चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २५.३२ लाख रुपये किंमतीचे ३५.६ तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार जप्त केली आहे.
यशोदास राठोड, रितेश राठोड, आकाश मैनावत, ऋतिक मैनावत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अभिषेक नानावत हा फरार आहे. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळ ते लोणावळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या टोळीचा छडा लावला. साईनगर वनविभागाजवळ जंगलात सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.
Dehugaon: तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार
ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो.नि. श्रीधर भोसले यांच्या नेतृत्वात पोहवा प्रशांत पवार, भरत माने, पोना सचिन गोनटे, अली शेख, अंजनराव सोडगीर व इतर गुन्हे शाखा पथकाने केली.