Team My Pune City –ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या शाळकरी मुलाला गेमिंगचा आयडी (Shikrapur Crime News)देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून साडेतीन लाखांचे दागिने घेणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.
मयूर उर्फ मुंजाजी भिसाड (वय २१, ) आणि किशोर डहाळे (वय २२, रा.) अशी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत़.
नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा परिसरातील एक शाळकरी मुलगा ऑनलाइन गेममध्ये गुंतला होता. त्याची सोशल मीडियावर भिसाड याच्याशी ओळख झाली. भिसाडने त्याला ‘गेमिंग आयडी’ देतो, असे सांगून जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने मुलाला घरातून ५ तोळे सोन्याचे दागिने आणण्यास सांगित. मुलाने घरातून घेतलेले साडेतीन लाखांचे दागिने भिसाड याला नेऊन दिले.
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणी मोहोळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
भिसाडने हे दागिने परभणी येथील किशोर डहाळे याला विक्रीसाठी दिले. दरम्यान, ‘गेमिंग आयडी’ चालत नसल्याने आरोपींनी मुलाकडे आणखी ₹५० हजार रुपयांची खंडणी मागितली. याबाबतची माहिती मुलाच्या वडिलांना मिळताच त्यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपासातून आरोपी आणि मुलामधील सोशल मीडियावरील संपर्क उघडकीस आला. पोलिसांनी भिसाडला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार किशोर डहाळेचे नाव सांगितले. त्यानंतर डहाळेलाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी या दोघांकडून ₹१.६२ लाख किंमतीचे २३ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे ,उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल देशमुख, विनायक मोहिते, प्रताप कांबळे यांनी केली.


















