situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shatrughna Kate : भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंचा मनसेला धक्का: मनसेची संपूर्ण कायदा आघाडीच भाजपमध्ये सामील!

Published On:
Shatrughna Kate

Team My pune city – आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे (Shatrughna Kate)यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का दिला आहे. मनसेच्या जनहित व विधी कायदा सेलच्या शहराध्यक्षा ॲड. प्रीतिसिंह परदेशी यांनी आपल्या संपूर्ण कायदा सेलच्या पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. बापू काटेंच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश पार पडला असून, यामुळे मनसेची शहरातील ताकद लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे मानले जात आहे.


शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड भाजप सध्या दमदार वाटचाल करत आहे. नुकतीच पार पडलेली तिरंगा भारत यात्रा, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त शहरात आयोजित विविध कार्यक्रम, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळाला साजरे करणारे ‘मोदी@११’ अंतर्गत उपक्रम यांसारख्या अनेक कार्यक्रमांचा धडाकाच त्यांनी लावला आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस या मुद्द्यांवर भाजपला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेला काटे यांनी हा राजकीय धक्का दिला (Shatrughna Kate) आहे.

Pimpri : सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल परमिट रूम आणि बार बंद


ॲड. प्रीतिसिंह परदेशी यांच्यासमवेत मनसे कायदा सेलचे महत्त्वाचे पदाधिकारी ॲड. श्रीधर यलमार, ॲड. रुचिरा कर्वे, ॲड. विद्या राठोड, ॲड. श्रुती जोगळेकर, ॲड. अमोल वाघ, आणि ॲड. रोहन देशपांडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.


यावेळी आपली भावना व्यक्त करताना ॲड. प्रीतिसिंह परदेशी म्हणाल्या, “देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबवून त्यांनी शत्रूराष्ट्र पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. तसेच गेल्या ११ वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत भारत नेत्रदीपक प्रगती करत आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारही महाराष्ट्रात चांगले कार्य करत आहे. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या संपर्कामुळे मी व माझे सर्व सहकारी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत (Shatrughna Kate)आहोत.”

Talegaon Dabhade : तंत्रज्ञान व जाहिरातीच्या युगात गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल- संतोष खांडगे


या पक्षप्रवेश सोहळ्याला युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजप राज्य परिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, हनुमंत लांडगे, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप प्रदेश सदस्य ॲड. मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, शहर सरचिटणीस शैला मोळक, महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाता पालांडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अजित कुलथे, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, कायदा आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. गोरक्षनाथ झोळ यांच्यासह शिवराज लांडगे, राजाभाऊ मासुळकर, दिनेश यादव, हरिभाऊ चिंचवडे, प्रवीण कुंजीर, बाळासाहेब परघळे, दीपक गांगुर्डे, आदित्य काटे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित (Shatrughna Kate) होते.

Follow Us On

Also Read