Team MyPuneCity – “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेल असं वाटलं नव्हतं, पण विचारभिन्नतेमुळे तशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र जे पक्षात राहिले, ते विचारांमुळेच राहिले आहेत. त्यामुळे फुटीबाबत चिंता करण्याचे कारण नाही. आगामी निवडणुकीत वेगळं चित्र समोर येईल,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे पक्षाच्या २६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते (Sharad Pawar) बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, नीलेश लंके, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून जनतेशी नातं घट्ट ठेवावं”
शरद पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहून लोकांशी बांधिलकी कायम ठेवली पाहिजे. राज्यात आणि केंद्रात काम करण्याची संधी पूर्वी मिळाली, ती पक्षाच्या विचारांमुळेच. आता पुन्हा नव्या जोमाने पुढे जाऊया.”
पवारांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. “१९८० मध्ये सत्ता हातात होती. तेव्हा ५०-५२ आमदार निवडून आले. पण पुढील सहा महिन्यांत फक्त सहा आमदार राहिले. त्यानंतर पुन्हा निवडणुकीत ७२ आमदार निवडून आले. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही,” असे त्यांनी (Sharad Pawar) ठामपणे सांगितले.
PCMC : गुरुवारी पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
“नवीन पिढी घडवण्यासाठी युवकांना संधी द्या”
“राज्यभरात तालुका आणि जिल्हा पातळीवर नव्या पिढीचे नेतृत्व तयार झाले पाहिजे. आपल्या पक्षात कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यांना संधी, प्रतिष्ठा देऊन सक्षम नेतृत्व उभे करण्याची जबाबदारी आपली आहे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
Lonavala : लोणावळ्यात घरफोडी; २९ लाखांच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याचा डल्ला
आर. आर. आबांची आठवण
शरद पवार (Sharad Pawar) यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही आठवण काढली. “आर. आर. आबा सामान्य कुटुंबातून पुढे आले. त्यांनी जिद्द, मेहनतीच्या जोरावर मोठे योगदान दिले. पक्षाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात कार्यकर्त्यांच्या कष्टांचा मोठा वाटा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
पक्षातील एकसंघपणा, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि नव्या नेतृत्वाची गरज यावर भर देत, शरद पवारांनी उपस्थितांना प्रेरणा दिली आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.