राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा विश्वास
Team My pune city ( प्रशांत साळुंखे) – पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना ( Sharad Pawar) विश्वासात घेतल्याशिवाय महापौर होणार नाही. ज्यांना जायचे होते ते गेले मात्र, जनता मात्र इथेच आहे. महापालिकेत शरद पवारांच्या विचाराची सत्ता येईल, असा विश्वास पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुरूवारी (दि. 24) व्यक्त केला.
Dhanore Murder : डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून खून, आळंदी पोलिसांनी घेतले दोन आरोपींना ताब्यात
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस रोहित पवार यांचा सत्कार सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, विकास लवांडे, शहराध्यक्ष तुषार कामठे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, रविकांत वर्पे, काशिनाथ जगताप, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, हनुमंत तरडे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिलाध्यक्षा ज्योती निंबाळकर, माधव पाटील, सागर चिंचवडे आदी उपस्थित ( Sharad Pawar) होते.

शशिकांत शिंदे म्हणाले म्हणाले की, सरकारने लाडक्या बहीणच्या योजनेला निकष लावून त्यांना लाभ देणे बंद करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बहिणी संतापल्या आहेत. महापालिका निवडणुकीनंतर निकष लावण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे. त्यानंतर 80 टक्के महिलांचे पैसे बंद होणार आहेत. राज्यात तीन इंजिनच सरकार आहे. कोण टॉवेलवर मारहाण करतोय, कोण पैशांची बॅग घेऊन सिगारेट ओढतोय. ज्यांनी मारामारी केली त्यांनी माजी खासदाराला आव्हान देत स्टॅम्प पेपरवर मारामारीचा करार करण्याची भाषा करीत आहे. पवित्र अश्या विधीमंडळात कोणाच्या बापाला घाबरत नाही, अशी भाषा वापरली जात आहे. जेथे कायद्याची चर्चा व्हायची तेथे मारामारीची चर्चा होते. पोलिस विभाग ( Sharad Pawar) हतबल झाले आहे.
दोन धर्मात तेढ लावून आणि आश्वासनाची खैरात करून सत्ताधारी निवडणूक जिंकतात. नवीन 350 दारूच्या दुकानाना परवानगी देऊन राज्यात दारूचा महापूर आणला जाणार आहे. बिल न दिल्याने सांगलीचे ठेकेदार हर्षल पाटीलने आत्महत्या केली. शेतकरी व बेरोजगार आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. तरीही, सरकार ढीम्म आहे, अशी टीका त्यांना सत्ताधार्यांवर केली.
मेळाव्यात विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या हस्ते शिंदे व पवार यांचे भक्ती-शक्तीची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, विविध सेल व पदाधिकार्यांकडून त्यांचा सत्कार झाला. सागर चिंचवडे यांनी ( Sharad Pawar) आभार मानले.
………
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डीपीतील रिंग रोड व रस्त्यांसाठी गोरगरीबांच्या घरांवरून बुलडोझर फिरण्याची तयारी प्रशसानाने केली आहे. घरे वाचविण्यासाठी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरा. मोर्चे काढा. जे गेले त्यांचा विचार करू नका, नागरिकांमधून नगरसेवक देऊ द्या. त्यांचा ठेका त्यांनीच घेतलेला नाही. आघाडी नाही तर स्वतंत्र लढू. लवकरच पिंपरी-चिंचवडमध्ये बेरोजगारांचा मेळावा घेऊन त्यांना सत्ताधार्यांप्रमाणे निवडणुकीपुरते पैसे न देता नोकरी देऊन स्वावंलबी करणार ( Sharad Pawar) आहोत.