Team MyPuneCity – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी येथे ‘एआय’ (Artificial Intelligence) विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार (Sharad Pawar-Ajit Pawar), सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार रोहित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार (Sharad Pawar-Ajit Pawar) तब्बल दोन वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. २ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून महायुतीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरच्या कालावधीत, सार्वजनिक कार्यक्रमात या दोन्ही गटांतील नेत्यांनी एकत्र उपस्थिती दर्शवली असली तरी संवाद मात्र टाळण्यात आला होता. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या. मात्र, अद्याप याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Pune : ‘दुबईमित्र’ सोमनाथ पाटील यांचा पुण्यात हृद्य सत्कार
दरम्यान, १० जून रोजी दोन्ही गटांचा पक्षवर्धापन दिन साजरा होत असून, शरद पवार यांचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात, तर अजित पवारांचा (Sharad Pawar-Ajit Pawar) कार्यक्रम बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेतेमंडळी कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंब्रा लोकल ट्रेन अपघाताबाबत वेगळाच संशय, गाडीतून पडलेला प्रवासी नेमकं काय म्हणाला?
मात्र चर्चासत्राच्या कार्यक्रमात एक दृश्य सर्वांचे लक्ष वेधून गेले. व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी शेजारील आसनांची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु अजित पवार व्यासपीठावर आल्यावर त्यांनी स्वतःच्या आसनाची जागा बदलण्याची विनंती केली. त्यामुळे शरद पवार यांच्या शेजारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची पाटी ठेवण्यात आली आणि अजित पवार वेगळ्या ठिकाणी बसले. त्यामुळे अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या शेजारी बसण्याचे टाळल्याचे स्पष्ट झाले.