situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shankar Jagtap: दिवाळी पहाट म्हणजे सण, संस्कृती आणि प्रबोधन यांचा सुंदर संगम – शंकर जगताप

Published On:

पिंपळे निलख येथे सचिन साठे सोशल फाउंडेशनतर्फे ‘दिवाळी पहाट व फराळ’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

“तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना, शंकर जगताप आणि सचिन साठे यांनी सादर केलेल्या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Team My Pune City  –सण, संस्कृती आणि समाज प्रबोधन व संघटन यांचा सुंदर संगम सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने दोन दिवसीय दिवाळी पहाट या कार्यक्रमात पहायला मिळाला आहे. या उपक्रमामुळे नव कलाकारांना व्यासपीठ मिळाले, नागरिकांमध्ये सांस्कृतिक चळवळ जागृत करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. मी माझे मित्र सचिन साठे आणि त्यांच्या फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे याबद्दल अभिनंदन करतो, तसेच सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो असे गौरवउद्गार आमदार शंकर जगताप यांनी काढले.

दिवाळी निमित्त पिंपळे निलख येथे सचिन साठे सोशल फाउंडेशन तर्फे दोन दिवसीय “शुभ दिवाळी पहाट – फराळ” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शनिवारी (१८ ऑक्टोबर) देवांग कोष्टी कार्यालय, शारदा कॉलनी येथे आणि रविवारी (१९ ऑक्टोबर) विशाल नगर, पिंपळे निलख येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये संगीत, मैत्री आणि सणाचा उत्साह यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमातील उत्साह शिगेला पोहोचला असताना आमदार शंकर जगताप आणि आयोजक सचिन साठे यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत “तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना” हे गाणे सादर केले भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी उत्साह वाढवला. या अप्रतिम सादरीकरणाने दोघांच्या मैत्रीतील आपुलकी, जिव्हाळा आणि वर्षानुवर्षांच्या नात्याचा स्नेह प्रकट झाला. उपस्थित प्रेक्षकांनी याला उत्स्फूर्त दाद दिली.

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, दिवाळीचा आनंद नागरिकांनी एकत्र येऊन साजरा करण्याची ही परंपरा अत्यंत सुंदर आहे. सचिन साठे आणि त्यांच्या फाउंडेशनचे मनःपूर्वक अभिनंदन, स्वागत, प्रास्ताविक करताना आयोजक सचिन साठे म्हणाले की, नकारात्मकतेवर मात करून सकारात्मकतेचा, प्रकाशाचा मार्ग दाखवणारा सण म्हणजे दिवाळी. ‘दिवाळी पहाट – फराळ’ या उपक्रमामुळे संगीत, संस्कृती आणि आपले स्नेहबंध आणखी दृढ करण्याचा क्षण आहे.

Republican Sena: उत्साह पूर्ण वातावरणात रिपब्लिकन सेनेचा स्नेह मेळावा संपन्न

यावेळी भुलेश्वर नांदगुडे, नितीन इंगवले, दिलीप बालवडकर, विजय जगताप, अनंत कुंभार, अनिल संचेती, अरविंद रणदिवे, गणेश कस्पटे, जेष्ठ नागरिक पिंपरी चिंचवड महासंघाचे अध्यक्ष वृषालीताई मरळ, सुरेश साठे, आप्पा थोपटे आदींसह परिसरातील नागरिक, युवा, महिला, विविध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी स्वरधारा म्युझिकल ग्रुप यांनी हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम सादर केला. दुसऱ्या दिवशी स्वरानंद म्युझिकल ग्रुप तर्फे डॉ. विजय पाटील, अश्विन भुते, सतीश इंगळे, पृथ्वीराज इंगळे, बबन ठोंबरे, किशोर देशमुख, विश्वास करंजे, सोमनाथ बरगुजे, स्मिता पाटील, मंगला जगताप, वैष्णवी शेवंते आणि गार्विका सोलंकी या स्थानिक कलाकारांनी सादरीकरण केले.

सकाळच्या उत्साहपूर्ण वातावरणात, विविध कलाकारांनी सादर केलेल्या उत्कृष्ट जुन्या, नव्या सुरेल संगीत रचना यामुळे ही ‘दिवाळी पहाट’ प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरली.

Follow Us On