Team MyPuneCity – श्री शाहू वाचनालयाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा(Shahu Library) करण्यात आला. सुरुवातीला जेष्ठ उद्योजक वकिलप्रसाद गुप्ता व शनी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष दीपक जडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.वाचनालायचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी प्रास्ताविक केले. जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्व उपस्थितांना सांगितले.
घावटे म्हणाले की, ” महाराष्ट्र घडवताना संतांनी नांगरलेल्या भूमीमध्ये राष्ट्रपुरुषांनी स्वत्व स्वाभिमानाचे बीज पेरले. समाजधुरीनांनी उत्तम विचारांची मशागत केली. संस्कृती, साहित्य, परंपरा, शौर्य, निर्धार, विचार, भक्ती,शक्ती आणि जागृती यामुळे आज महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे.”
जेष्ठ संचालक भरत गायकवाड , वकिलप्रसाद गुप्ता व दीपक जडे यांनीही मनोगत व्यख केले.
कार्यक्रमाचे संयोजन सहायक ग्रंथपाल प्राजक्ता पवार आणि रवींद्र अडसूळ यांनी केले.
Vadgaon Maval : खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेती विकास सोसायट्याच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करणार – माऊली दाभाडे
खजिनदार राजेंद्र पगारे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त राजाराम रायकर यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी वाचक वर्ग उपस्थित होता.