स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती व अभ्यासिका दशकपूर्तीनिमित्त आयोजन (Arvind Gokhale)
Team MyPuneCity – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आणि श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाच्या अभ्यासिकेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त “संघर्ष पाकिस्तानशी” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक अरविंद गोखले (Arvind Gokhale) यांचे विशेष व्याख्यान आज (बुधवारी) सायंकाळी ६ वाजता तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले असून वाचनालयाच्या कै. क्षमा अरविंद शहा सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानासाठी ‘मावळ ऑनलाईन डॉट कॉम’चे संचालक व ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या व्याख्यानाद्वारे पाकिस्तानप्रश्नी भारताचा ऐतिहासिक, सामरिक आणि राजकीय दृष्टिकोन उलगडण्यात येणार असून गोखले (Arvind Gokhale) यांचा सखोल अभ्यास आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण श्रोत्यांना मार्गदर्शनात्मक ठरणार आहे. या व्याख्यानातून युवकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक बळकट होण्यास मदत होते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Jyoti Malhotra : पाकिस्तानच्या ISI चे हेरगिरी मॉड्यूल भारतात कसे काम करते? हनी ट्रॅपचा पॅटर्न काय?
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी, चिटणीस प्रीतम भेगडे, ग्रंथपाल विनया अत्रे व सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून तळेगाव परिसरातील वाचक, नागरिक व युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.