Team My pune city ( डॉ. सचिन बोधनी ) – आजकाल माझ्याशी अनेक ५५ वर्षांवरील नागरिक संपर्क साधतात. त्यांच्या मनात एकच चिंता ( Senior citizens)असते – “आता पुढचं आयुष्य कसं चालवायचं?” अनेकांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं, पण प्रत्येकाला निवृत्तीनंतरच्या काळासाठी पुरेशी आर्थिक तरतूद जमलीच असेल, असं नाही.
या वयोगटातील व्यक्तींना अजूनही काम करण्याची इच्छा असते. त्यांच्याकडे अनुभव, संयम आणि निष्ठा असते. ते कमी वेतनातही समाधानाने काम करू इच्छितात – विशेषतः अशा ( Senior citizens)ठिकाणी जिथे तरुण काम करायला तयार नसतात, जसे की – वाचनालय, पतसंस्था, रिसॉर्ट, फार्महाऊस, इ.
Pranjal Khewalkar : मोठी बातमी… प्रांजल खेवलकरचा अल्कोहोल रिपोर्ट आला …
माझ्याकडे अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांची यादी ( Senior citizens)आहे, जे अजूनही पूर्ण क्षमतेने काम करण्यास तयार आहेत. त्यांच्या या इच्छेला आधार देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं.
Talegaon Dabhade: कै. डॉ. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान लेखन पुरस्कार सोहळा संपन्न
माझं सर्व संस्थांना आणि उद्योगपतींना आवाहन ( Senior citizens) आहे की, अशा अनुभवी लोकांना कामाची संधी द्यावी. यामुळे केवळ त्यांना आर्थिक आधार मिळणार नाही, तर त्यांच्या आत्मसन्मानालाही बळ मिळेल.
यासोबतच, लवकरच आपण सरकारकडेही अधिकृत मागणी करणार आहोत की, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रोजगार योजना राबवण्यात याव्यात.
हा विषय केवळ सामाजिक नव्हे, तर मानवी संवेदनांचा ( Senior citizens) आहे. त्यामुळे मीडियामार्फत समाजात जागृती निर्माण व्हावी,
लेखक -डॉ. सचिन बोधनी ,प्रदेश अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ.