Team My Pune City –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी ( Savitribai Phule Pune University) संलग्न महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुदत संपल्याने शिक्षण अर्धवट राहिलेल्या जवळपास ९६ हजार विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचा कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन) पुन्हा खुला करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.
PMC : पुण्यात ३ नोव्हेंबरपासून खड्डेमुक्त रस्ते मोहीम; १५ टीम्स राबवणार अभियान
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना (Savitribai Phule Pune University) ठराविक कालावधीत पदवी शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे वेळेत परीक्षा देता आली नाही. काहींचे एक-दोन विषय राहिले, तर काहींचे संपूर्ण शिक्षण अपूर्ण राहिले. परिणामी हजारो विद्यार्थी पदवी पूर्ण करू शकले नाहीत.
Pune Accident News:ताम्हिणी घाटात दरड कोसळून स्नेहल गुजराती यांचा मृत्यू
गेल्या काही महिन्यांपासून पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना (Savitribai Phule Pune University) पुन्हा परीक्षा देण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून होत होती. या मागणीची दखल घेत विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर परीक्षा मंडळाने याचा सविस्तर आढावा घेतला आणि अखेर व्यवस्थापन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.
आता विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून लवकरच परिपत्रक जारी केले जाणार आहे. या निर्णयामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील जवळपास ९६ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा मार्ग खुला होणार असून, विद्यार्थ्यांना पदवी मिळवण्याची संधी पुन्हा उपलब्ध होणार आहे.व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडिराम पवार यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर (Savitribai Phule Pune University) वाचेल.


















