Team My Pune City – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ( Savitribai Phule Pune University) (एसपीपीयू) खासगी व अभिमत विद्यापीठांच्या वाढत्या संख्येचा मोठा फटका बसला आहे. विद्यापीठाच्या ३३ शैक्षणिक विभागांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी दाखल झाले असून, विशेषतः पीएचडी अभ्यासक्रमातील प्रवेशसंख्या गेल्या चार वर्षांत २३५ वरून केवळ १७ इतकी घसरली आहे.
Maval Vichar Manch : वैचारिक दारिद्रय कधीही दाखवू नये-चंद्रकांत निंबाळकर
प्रवेश घटण्यामागील कारणे ( Savitribai Phule Pune University)
- शैक्षणिक संकुलात प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त असल्याने संशोधनासाठी आवश्यक मार्गदर्शक उपलब्ध नाहीत.
- पीएचडी प्रवेश प्रक्रियेत लालफितीचा कारभार आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण करण्यास विलंब होतो.
- खासगी व अभिमत विद्यापीठांमध्ये पर्यायी अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने विद्यार्थी तिकडे वळत आहेत.
- संलग्न महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जात असल्याने विद्यापीठ संकुलातील प्रवेश कमी झाले आहेत.
संशोधनावर परिणाम
या घटीचा थेट परिणाम संशोधनावर झाला असून, शोधनिबंध प्रसिद्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. तज्ज्ञांच्या मते, परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न केल्यास विद्यापीठातून संशोधक घडण्याची प्रक्रिया थांबण्याची भीती आहे.
अधिछात्रवृत्ती आणि संशोधन पत्रिका
विद्यापीठाच्या फंडातून दरवर्षी २० विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाते. मात्र, पात्र संशोधकच उपलब्ध नसल्याने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात केवळ १४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. याचबरोबर, संशोधन पत्रिकाही कमी प्रमाणात प्रसिद्ध होत असल्याची कबुली विद्यापीठ ( Savitribai Phule Pune University) प्रशासनाने दिली आहे.
अधिसभेत चर्चा अपेक्षित
विद्यापीठाची सिनेट अधिसभा ३० सप्टेंबर रोजी होणार असून, या अधिवेशनात प्रवेशातील घट, संशोधनातील अडथळे आणि अधिछात्रवृत्तीतील घट यावर चर्चा होणार आहे. अधिसभा सदस्य शंतनू लामधाडे आणि डॉ. चिंतामण निगळे यांनी पीएचडी प्रवेशातील घटाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संगीता जगताप यांनी लेखी उत्तर देत, खासगी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमुळे प्रवेशसंख्या कमी झाल्याचे स्पष्टीकरण दिले ( Savitribai Phule Pune University) आहे.