Team My pune city -“आजच्या युगात बदलती जीवनशैली ही केवळ ( Savarkar Mandal) व्यक्तीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंब व्यवस्थेवर प्रभाव टाकत आहे. विशेषतः हिंदू कुटुंबसंस्था अनेक आव्हानांना सामोरी जात आहे,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या नयना सहस्त्रबुद्धे यांनी केले.
Death of youth : जिममध्ये व्यायाम करत असताना 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चिंचवड येथील घटना
निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे आयोजित “बदलती जीवनशैली व हिंदू कुटुंबातील आव्हाने” या विषयावर आयोजित व्याख्यानात ( Savarkar Mandal) त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन ‘स्वातंत्र्य सावरकर मंडळ’ या संस्थेने केले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात शहरीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक, सामाजिक माध्यमांचा प्रभाव, नातेसंबंधातील दुरावा आणि परंपरागत ( Savarkar Mandal) संस्कारांचा अभाव यासारख्या मुद्द्यांवर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी उदाहरणे देत सांगितले की, पूर्वीचा ‘संयुक्त कुटुंब पद्धतीचा गाभा’ आज ढासळताना दिसतो आहे, आणि त्यामुळे वृद्ध, लहान मुले व स्त्रिया अधिक असुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या एकाकी होत चालले आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, “परिवारातील संवाद कमी होणे, मूल्यांचे क्षरण, आणि व्यक्तिकेंद्रित जीवनशैली यामुळे कुटुंबातील सुसंवाद तुटत आहे. या स्थितीतून बाहेर( Savarkar Mandal) पडण्यासाठी पारंपरिक मूल्यांवर आधारित आधुनिक जीवनशैलीची पुनर्रचना आवश्यक आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यात अनेक श्रोत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
नयना सहस्त्रबुद्धे, विश्वनाथन नायर,अश्विनी अनंतपुरे, वैदेही पटवर्धन व अनघा कानडे यांच्या शुभहस्ते भारत मातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात ( Savarkar Mandal) झाली. पल्लवी कोंडेकर यांनी सूत्रसंचालन केले
अश्विनी अनंतपुरे यांनी प्रास्ताविक केले, शितल गोखले यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या शुभहस्ते वक्त्यांचे स्वागत करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागाच्या समृद्धी पैठणकर यांनी आभार प्रदर्शन केले. श्रावणाच्या शुभक्षणांत, सौंदर्य व सौभाग्याचं प्रतीक असलेलं हळदीकुंकू समारंभाने कार्यक्रमाची ( Savarkar Mandal) सांगता झाली.