Team My Pune City – चार दशकांहून अधिक काळ ( Satish Shah)प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे आज (२५ ऑक्टोबर) दुपारी साडेदोनच्या सुमारास मुंबईत निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रात शोककळा पसरली असून, सहकारी कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.
सतीश शाह यांनी आपल्या अनोख्या अभिनयशैली आणि अफाट विनोदबुद्धीमुळे घराघरात लोकप्रियता मिळवली. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्यंगचित्रपट ‘जाने भी दो यारो’ मधील त्यांच्या बहुपदरी भूमिकांनी त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘हम साथ-साथ हैं’, ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘कभी हां कभी ना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिकेतून त्यांनी वेगळेपणा दाखवत आपल्या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाची छाप ( Satish Shah) सोडली.
MLA Sunil Shelke : मावळ मधील राजकीय समीकरणे बदलणार; मामा भाच्याचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’
फक्त चित्रपटच नव्हे तर दूरदर्शनवरही त्यांची लोकप्रियता अफाट होती. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेतील इंद्रवदन साराभाई ही व्यक्तिरेखा आजही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक संस्मरणीय कॉमिक रोल्सपैकी एक मानली जाते. याआधी १९८४ मधील प्रसिद्ध सिटकॉम ‘ये जो है जिंदगी’ मधून त्यांनी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचत लोकांची मने जिंकली ( Satish Shah) होती.





















