Team My Pune City – काही दिवसांपूर्वी ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभेमध्ये बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस म्हणून त्यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला होता, त्यानंतर भुजबळांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आपले मत मांडले होते. यावर आता सारंगी महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सारंगी महाजन म्हणाल्या ,प्रकाश महाजन जे तुम्हाला बोलले आहेत ते पूर्णपणे वेगळं आहे, वारसदार पंकजा मुंडे होऊ शकत नाहीत, बीडची जनता असू शकते वारसदार, पण मुंडे नाव आहे म्हणून हे वारसदार आहे, असं होऊ शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या नखाची सर देखील यांच्यात नाही. जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, जे प्रामाणिकपणे काम करतात ते देखील खरे वारसदार असू शकतात, असं सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे.
पुढे त्या पंकजा मुंडे बाबत म्हणाल्या कि , पंकजा मुंडे या लहान असताना माझ्य संपर्कात असायच्या, त्यावेळी त्या खूप चांगल्या होत्या, मला त्यांचा स्वभाव आवडायचा, आज पण चांगल्याच आहेत, पण त्यांचा स्वभाव आता असा कसा झाला हे मला माहीत नाही .
Amit Shah: भाजपच कार्यालय हे फक्त कार्यालय नसून भाजपसाठी एक मंदिर आहे-अमित शाह


















