Team My Pune City – सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील (Sant Nirankari Mission) संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे झोन चा बाल संत समागम सकाळी १० ते १ या वेळेत संपन्न होणार आहे.या बाल समागम ला पुणे झोन मधून ३ ते १५ वयोगटातील लहान बालक हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Gandhipeth Women’s Council : गांधीपेठ महिला मंडळात गणेश अथर्वशीर्ष पठण; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
आज संत निरंकारी मिशन लहान मुलांना आध्यात्मिकतेचे धडे देऊन त्यांना नैतिकता, मानवी गुण शिकवून समाजासाठी एक सुजाण नागरिक बनवण्याचे कार्य करीत आहे. सुसंस्कारित(Sant Nirankari Mission) मुले उत्तम समाज निर्माण करू शकतात त्यासाठी मुलांचा बौद्धिक,मानसिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक विकास होणे गरजेचे आहे. मुलांना शिक्षणाबरोबर आध्यात्मिक संस्काराची गरज आहे, हे संस्कार केवळ संतांच्या सानिध्यात मिळत असतात म्हणून निरंकारी सत्संगच्या माध्यमातून असे विशाल बाल संत समागम आयोजित केले जातात.
Dehu Road Cantonment : देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक
या सत्संग सोहळ्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून मिशनचे थोर विचारवंत,लेखक सखाराम लव्हटे (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे . या बाल संत समारोहामध्ये (Sant Nirankari Mission) लहान-लहान मुले अवतारवाणी गायन, हरदेव वाणी गायन, कविता, नाटिका, गीत, विचार यांद्वारे सदगुरू चा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवून आशीर्वाद प्राप्त करतील.
तसेच सर्वांसाठी संत निरंकारी प्रदर्शनी चे आयोजन हि करण्यात आले आहे. भोसरी-दिघी परिसरातील सुमारे १५ शाळेतील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असून आजूबाजूच्या परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना या बाल संत समारोहा चा लाभ प्राप्त करून द्यावा असे आवाहन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रमुख) यांनी केले (Sant Nirankari Mission) आहे.