Team My Pune City –सर्व राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची तयारी केली जात आहे. यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय राऊत यांच्याबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. संजय राऊतां नी स्वतः एक पत्र सोशल मीडियावर पत्र लिहून त्यांच्या आरोग्यासंबंधी ही माहिती दिली आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच आपल्या(Sanjay Raut) ट्विटर हँडलवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे.
Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
Pune: सामाजिक स्थित्यंतरांसाठी साहित्यकृतींचे मोलाचे योगदान
संजय राऊत म्हणाले ,
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती
जय महाराष्ट्र !
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन.
वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे.
मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.
कळावे.
Sanjay Raut on X: “https://t.co/5YKuWtahVM” / X
संजय राऊत हे शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. राऊत सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत असतात. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आणि विरोधकांवर आगपाखड करण्याचे काम संजय राऊत एकहाती करत असतात. दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडतात. अशातच आता त्यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राजकारणातून ब्रेक घेतला आहे.





















