Team My Pune City – शिवसेने (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांना सोमवारी सकाळी अचानक अस्वस्थ वाटल्याने त्यांना तातडीने मुंबईतील भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ( Sanjay Raut) परिषद संपल्यानंतर त्यांना अस्वस्थता जाणवली आणि कोणतीही जोखीम न घेता त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांनी याच रुग्णालयात रक्त तपासणी केली होती. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा आहे.
Kartavya Ratna Award : कर्तव्यरत्न पुरस्कारातून समर्पण, चिकाटी आणि निस्वार्थ सेवेची दखल
राऊत यांच्या प्रकृतीच्या घडामोडींनी राजकीय वर्तुळातही खळबळ ( Sanjay Raut) उडवली आहे. कारण, आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. “महाविकास आघाडीतील काँग्रेसलाही सोबत घेणे आवश्यक आहे, अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
Prashant Bhagwat : विकास, समाजकार्य आणि जनसंपर्क यांचा अद्भुत संगम म्हणजे प्रशांत दादा भागवत
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रक्रियेत संजय राऊत मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचे दिसते. शिवसेना (ठाकरे गट) च्या भूमिकेचे ते सातत्याने प्रभावीपणे मांडणी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती आणि पुढील हालचालींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत ( Sanjay Raut) झाले आहे.