Team My pune city – सांगवी परिसरात पतीने गळफास घेऊन आत्महत्या( Sangvi suicide Case) केल्याची घटना गुरुवारी (२४ जुलै) सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे त्याच्याजवळच पत्नी मृतावस्थेत आढळली आहे. पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. शाम वाघेला (५०) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून, त्यांची पत्नी राजश्री वाघेला (४५) यांचा मृतदेह घरात आढळून आला. ही घटना सांगवी येथील हनुमान चौक परिसरात गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघेला दांपत्य घरी दोघेच राहत होते. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. राजश्री वाघेला या पिंपरीतील शाळेत शिक्षिका आहेत तर शाम वाघेला यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री उशिरा दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. राजेश्री वाघेला यांनी वादानंतर आपल्या मुलीला फोन करून याबाबत माहिती दिली होती. “उद्या सकाळी येऊन भेटते” असे मुलीने ( Sangvi suicide Case) सांगितले होते.
PMPML : पीएमपीएमएलची पुणे लोणावळा मार्गावर पर्यटन बस सेवा
त्यानुसार मुलगा गुरुवारी सकाळी घरी आली. तिने घराचा दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिने इतर नातेवाईकांना बोलावले आणि दरवाजा तोडला. त्यावेळी शाम वाघेला यांनी गळफास घेतलेला तर आई मृतावस्थेत आढळली. राजश्री यांच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करून स्वतः गळफास घेतला असल्याचे सांगितले ( Sangvi suicide Case) जात आहे.