Team My Pune City – सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Sangvi News )पिंपळे सौदागर येथे पूर्वपरवानगी न घेता मिरवणूक काढून मिरवणुकीमध्ये लाऊड स्पीकर डीजे मोठ्या आवाजात लावल्या प्रकरणी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rashi Bhavishya 8 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
बिपिन जयप्रकाश उपाध्याय (37, रा. रो हाऊस नंबर 6, वेदान्त सोसायटी, पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव ( Sangvi News ) आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार तुषार साळुंखे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तास 26 मिनिटे चालली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपिन उपाध्याय यांनी रविवारी 7 सप्टेंबर रात्री कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गणपती विसर्जन मिरवणूक काढली. सार्वजनिक ( Sangvi News ) रस्त्यावर लाऊड स्पीकर आणि डीजे मोठ्या आवाजात लावला. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला. याबाबत भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 136 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.